Home गडचिरोली पॅरामाऊंट ऍचीव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकरिता डॉ. प्रणय खुणे यांची निवड

पॅरामाऊंट ऍचीव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकरिता डॉ. प्रणय खुणे यांची निवड

78

– जिल्ह्यात साडेसातशे किमीचे रस्ते बांधून निर्माण केली कनेक्टिव्हिटी

– राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिला अनेकांना न्याय

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 15 जुलै : पॅरामाउंट ऍचीव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. प्रणय खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत अतिदुर्गम भागात साडेसातशे किलोमीटरच्या वर रस्ते निर्माण केले व विविध ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रस्त्याद्वारे कनेक्टिव्हिटी निर्माण केली. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम तसेच जिल्ह्यतील अन्याय, अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी, गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम, अतिदुर्गम भागात प्रत्यक्ष भेटी देऊन गोरगरीब आदिवासी सोबत संवाद साधले. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

सदर कार्य करीत असताना अनेक वाहनांची तसेच मशीनरींची आजपर्यंत जाळपोळ सुद्धा झाली. परंतु न खचता त्यांनी शून्यातून आपले कार्य अविरत सुरू ठेवले व त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा उलाढाल असलेला खुणे कन्स्ट्रक्शन अँड कंपनी तसेच एल, एल, डोंगरवार अँड कन्स्ट्रक्शन कंपनी उत्कृष्टरित्या सुरु ठेवले. त्यांचे कार्य आजही अविरत सुरू आहे. तसेच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे व त्यांना महाराष्ट्र राज्यातून पॅरामाउंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे.

याबद्दल त्यांचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राहुल झोडे, प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, मुख्य सल्लागार देवानंद खुणे, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा विश्वास, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर, विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा मडावी, भंडारा जिल्हाध्यक्ष नंदू समरीत, गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू खुणे, युवा मानवाधिकार संघटना अध्यक्ष पारस खुणे, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानु उपाध्ये, तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,भीमराव वनकर, तालुका अध्यक्षा रुपाली कावळे, नागेश मडावी यांनी अभिनंदन केली आहे. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा गडचिरोलीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!