विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
फळ व अन्नदान वितरण
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा महिला व बाल सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे फळ वाटप व अन्नदान वितरण करण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अतुल मल्लेलवार, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष समशेरखा पठाण, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी इटनकर, युवक काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, काँग्रेस कमिटी गडचिरोली शहराध्यक्ष सतिश विधाते, काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार, काँग्रेस कमिटी गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विवेक घोंगळे, प्रकाश ताकसांडे, अतुल रामलवार, प्रवीण देशमुख, उमेश आखाडे, अभिजित धाईत, सारंग हेमके, संतोष करवे, अभिषेक, स्वप्निल गैरे, नवनाथ गोरे, घनश्याम वाढई, माजीद सय्यद, कवींद्र बोरकर, संजय गावंडे, गणेश तारक, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार, कुणाल ताजने, जावेद शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कॅम्प एरिया दुर्गामाता मंदिर गडचिरोली येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त सनराईज कान्व्हेट स्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय नोटबुक वाटप करून खासदार डॉ. नामदेव किरसान यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष समशेरखा पठाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी इटनकर ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीहरीजी चौधरी, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शहर अध्यक्ष सतिश विधाते, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, पारधी, भोयर, दयाकर चौधरी, प्रकाश ताकसांडे, अतुल रामलवार, प्रवीण देशमुख, उमेश आखाडे, अतुल मल्लेलवार, शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावार, नितेश राठोड, खरवडे, नवनाथ गोरे, घनश्याम वाढई, माजीद सय्यद, कवींद्र बोरकर, संजय गावंडे, गणेश तारक, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार, कुणाल ताजने, जावेद शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

वीर बाबुराव शेडमाके जि. प. शाळा विसापूर येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय नोटबुक वाटप करून खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांना शिक्षक, शाळा समिती सदस्य व विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष, रुपेश टिकले, शहराध्यक्ष सतिश विधाते, महादेव पाटील बोरकर, नथुजी पेटकर, संजय मेश्राम, बानबले, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार, कुणाल ताजने आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.







