Home गडचिरोली बायरकडून बिकोटा ही भातपिकातील खोडकिडीच्या प्रतिबंधासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना बाजारात

बायरकडून बिकोटा ही भातपिकातील खोडकिडीच्या प्रतिबंधासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना बाजारात

97

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : बायर या शेती आणि आरोग्यसेवा या जीवविज्ञान शाखांमधील एका आघाडीच्या कंपनीने भातपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना खोडकिडीचा सामना करण्यासाठी सक्षम करण्यासाठी बिकेटा या नवीन उत्पादनाची घोषणा केली आहे. या धोकादायक कीटकापासून उत्तम संरक्षण देण्यासाठी बिकोटामध्ये बायरच्या विशेष संशोधनाचा समावेश करण्यात आला आहे. बिकोटा जून २०२५ पासून पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यासह प्रमुख भात उत्पादक राज्यांमध्ये उपलब्ध होईल.

खोडकिडीमुळे भात पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे उत्पादनात घट होते. बिकोटा या कीटकाचा उपद्रव थांबवण्यासाठी जलद गतीने काम करते आणि दीर्घकाळ टिकणारे संरक्षण देते. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर उपायांच्या तुलनेत बिकोटा फक्त एकदा वापरून शेतकरी दीर्घ कालावधीसाठी अतिरिक्त संरक्षण मिळवू शकतात. तसेच त्याचा वापर केल्याने मुळे जोमाने वाढतात. त्यामुळे पिकांचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि बदलत्या हवामान परिस्थितीत खोडकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रित करता येतो, तसेच उत्पादनातही वाढ होते.

या अनावरणप्रसंगी बोलताना बायरच्या पीक विज्ञान विभागाचे भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन बाबू म्हणाले, “बायर आपल्या नवनवीन शोधांद्वारे शेतकऱ्यांचे जीवन सोपे करण्याचा प्रयत्न करत राहते. बिकोटाच्या माध्यमातून आम्ही केवळ भात उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे संरक्षण करणारी उपाययोजना देत नाही तर त्यांचा वेळ आणि मजुरीचा खर्चदेखील वाचवणे आणि त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न सुधारण्यास मदत करतो.

बिकोटा वापरण्यास आणि मित्र कीटकांसाठी सुरक्षित आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांसाठी एक आदर्श पर्याय ठरते आणि एकात्मिक कीटक व्यवस्थापन (आयपीएम) पद्धतींमध्ये देखील उत्तमरित्या समाविष्ट होते. त्याचे सुक्ष्म सूत्रीकरण वापर सुलभ बनवते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात या औषधाचा एकसमान फवारा करणे शक्य होते.
या उत्पादनाबाबत अधिक माहितीसाठी कृपया बायर फार्मराइज ॲपला भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे. https://go.bayer.com/FarmRise_Bayer_Bicota

error: Content is protected !!