Home गडचिरोली काटोल येथे शेकापचा विदर्भस्तरीय मेळावा

काटोल येथे शेकापचा विदर्भस्तरीय मेळावा

119
Oplus_131072

– गडचिरोलीहून शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक स्वराज संस्थांच्या येणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने राज्यभरात तयारी सुरू केलेली असून विभागवार कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. विदर्भातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे मंगळवार, १० जून रोजी होणार असून या मेळाव्याकरिता महिला नेत्या जयश्रीताई जराते, भाई शामसुंदर उराडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शेकापचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

या मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, माजी आमदार भाई बाळाराम पाटील, आमदार भाई डाॅ. बाबासाहेब देशमुख, खजिनदार भाई आर्कीटेक्ट अतुल म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे, पाॅलीट ब्युरो सदस्य भाई प्रा. एस. व्ही. जाधव, सहचिटणीस चिटणीस भाई बाबासाहेब देवकर, भाई राहुल देशमुख, चिटणीस मंडळाचे सदस्य भाई रामदास जराते, ॲड. मानसीताई म्हात्रे, भाई डाॅ. अनिकेत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शेकापची रणनिती, आघाडी, संघटनात्मक नियुक्त्या, उमेदवारांची निवड आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवरील भविष्यातील लढे याविषयी या मेळाव्यात पक्षनेतृवाकडून भूमिका मांडण्यात येणार आहे.

गडचिरोली शेकापच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार, १० जून रोजी सकाळी ६ वाजता मोठ्या संख्येने शेकाप जिल्हा कार्यालय येथे हजर राहावे, असे आवाहन गडचिरोली शेकापचे पदाधिकारी भाई चंद्रकांत भोयर, भाई रमेश चौखुंडे, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, महामार्ग बाधित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर गव्हारे,अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शोएब पटेल, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शर्मीश वासनिक, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष गुड्डू हुलके, महिला जिल्हाध्यक्ष कविता ठाकरे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिलाषा मंडोगडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!