विदर्भ क्रांती न्यूज
चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरांबा येथील रहिवासी श्रीमती पार्वताबाई हरिजी कुनघाडकर यांचे वृद्धापकाळाने बुधवार, 4 जून 2025 रोजी सायंकाळी 5.20 वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्या 87 वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, 5 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता हरांबा येथील वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या कृषक हायस्कूल चामोर्शी येथील ज्येष्ठ शिक्षक संजय कुनघाडकर व हरांबा येथील शेतकरी मोहन कुनघाडकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन स्नुषा, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.