परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केल्याचा अभिमान : डॉ. अशोकजी नेते

52
Oplus_16908288

– बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व संघमित्रा बुद्ध विहार लोकार्पण सोहळा मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते उत्साहात

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : बौद्ध समाज आदर्श नगर मोखाळा यांच्या वतीने बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व संघमित्रा बुद्ध विहार लोकार्पण सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाला उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “भगवान गौतम बुद्ध यांनी मानवजातीला शांततेचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचा प्रसार होणे ही काळाची गरज आहे. बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व संघमित्रा बुद्ध विहाराचे लोकार्पण माझ्या हस्ते होणे, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.”

माजी खासदार अशोक नेते पुढे सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारले असून, त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून केंद्र सरकारने अनेक उपक्रम राबवले आहेत. इंदू मिलची जागा देणे, महू येथे भव्य स्मारक उभारणे, लंडनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय करणे ही बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करणारी उदाहरणे आहेत. याचा मला अभिमान वाटतो”, असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी केले.

या सोहळ्याला प्रामुख्याने खासदार डॉ. नामदेवराव किरसान, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष तथा आरपीआयचे नेते अँड. रामभाऊ मेश्राम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी बांधकाम सभापती दिनेश पा. चिटनुरवार, गडचिरोली जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल, भाजपा तालुकाध्यक्ष अर्जूनजी भोयर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन गोहने, मोखाळाचे सरपंच प्रणिता म्हशाखेत्री, उपसरपंच विनोदजी पोहनकर, कृ.उ.बा.स संचालक केशव भरडकर, ॲड. प्रकाशजी भोयर, सामाजिक नेते अनिल पा. म्हशाखेत्री, सामाजिक नेते गोपालजी रायपूरे, ग्रामपंचायत सदस्य भावेशजी नागोसे, जयश्री फाले, अस्मिता मुळे यांच्यासह या कार्यक्रम मंडळाचे राहुल चूनारकर, राजु थेरकर, विनायक दुधे, माजी पं. स. सदस्या तथा सामाजिक नेत्या चुनारकर तसेच अनेक कार्यकर्ते व मान्यवर या धार्मिक आणि सामाजिक सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्धपणे झाले. परिसरात उत्सवाचे वातावरण होते. स्थानिक नागरिक, बुद्ध भक्त, कार्यकर्ते यांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग नोंदवून हा कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पडला.