Home गडचिरोली कारवाफा आश्रमशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कारवाफा आश्रमशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

155

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा येथे सोमवार, १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, क्रांतिसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक सी. डी. नळे, पद्मावती महेशगौरी, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, वर्षा मस्के, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे, आय. एम. कुमरे, अधीक्षक गजानन सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, सुनिता देवावार, संगीता करंगामी आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी तसेच विद्यार्थिनी संजना हिचामी, कल्याणी परसे, शशिकला उसेंडी, संयुक्ता तुमरेटी, श्रुती उसेंडी, पिंकी एक्का, साक्षी नरोटे, राणी मडावी, रचना मडावी, मीनाक्षी गावडे, पूर्वी परसे आदींनी क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले.

क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम अंतर्गत ८ ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी समीक्षा उसेंडी हिने केले. संजना मट्टामी या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!