– माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा इशारा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी – प्राणहिता व अहेरी – व्यंकटरावपेठ या मंजूर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम अधिकार आलापल्ली यांना निवेदन दिले आहे.
अहेरी -प्राणहिता व अहेरी – व्यंकटरावपेठा या रस्त्याचे काम मंजूर झाल्यानंतरही संबंधित कंत्राटदारानी अर्धवट काम करून ठेवले आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुन व दूरध्वनीवर संपर्क करूनही रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही.







