Home गडचिरोली शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी नारीशक्तीचा होणार गौरव

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी नारीशक्तीचा होणार गौरव

113

– माजी जि. प. सभापती वेणूताई ढवगाये यांचा ‘सेवाव्रती’ पुरस्काराने होणार सन्मान

– शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्याकडून ढवगाये यांच्या कार्याची दखल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती वेणूताई ढवगाये यांनी राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याच्या दखल घेऊन गडचिरोली जिल्हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वेणूताई ढवगाये यांचा ३ जानेवारी २०२५ रोजी स्त्री शिक्षणाच्या आद्यकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ‘सेवाव्रती’ पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भेटवस्तू, शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला जातो. त्यानुसार यावर्षी ‘सेवाव्रती’ सन्मानासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती वेणूताई ढवगाये यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला जाणार आहे.

मा. उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना महिलांच्या उन्नतीसाठी सदैव कटीबध्द असून वेणूताई ढवगाये यांचे कार्य समाजातील प्रत्येक माता भगिनींसाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना शिवसेना (उध्दव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!