Home गडचिरोली संतांनी सांगितलेला विज्ञानवाद अंगीकारा : अनुप कोहळे

संतांनी सांगितलेला विज्ञानवाद अंगीकारा : अनुप कोहळे

91
Oplus_131072

– अनंतपूर येथे संत जगनाडे महाराज यांची 400 वी जयंती साजरी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर येथे संताजी स्नेही मंडळ अंनतपूरच्या वतीने श्री. संत जगनाडे महाराज यांच्या 400 व्या जयंतीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक म्हूणन जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे उपस्थित होते.

21 वा शतक हा विज्ञानाचा युग आहे. मात्र अजूनही समाजातील बहुसंख्य लोक अंधश्रद्धा पाडतात. संत महात्म्यांची जयंती ही फक्त मिरवण्यासाठी नसून त्यांनी सांगितलेल्या विचारांवर चालण्यासाठी आहे. 400 वर्षापूर्वी संतांनी जो विज्ञानवाद सांगतिला तोच चिकित्सक दृष्टीकोन व विज्ञानवाद आत्मसात करणे काळाची गरज आहे. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको, असे प्रतिपादन अनुप कोहळे यांनी आपल्या मार्गदर्शनिय भाषनातून केले.

या जयंती महोत्सवात विशेष अतिथी म्हूणन ग्रा. प. विसापूरचे उपसरपंच काशिनाथ बुरांडे, दिवाकर बारसागडे निमाडर (टोला), रोशन बारसागडे, बाळाराम दूधबावरे,  मारोती बुरांडे, रविन्द्र नरताम, संतोष नरताम, मोरेश्वर वासेकर,  रमेश वासेकर, रोहिदास बारसागडे  आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, तुलसीराम बुरांडे व गिरमाजी दुधबावरे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता नैताम आशासेविका अनंतपुर तर आभार खोजेंद्र सातपुते यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी, महिला, युवक  व इतर समज बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!