विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्याने गडचिरोली लांजेडा, माडेतुकुम, बोधली व खरपुंडी या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक नैतिक महासभा जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांच्या अध्यक्षखाली कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रमोदजी पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले की, महाराष्ट्रला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची परंपरा लाभली आहे. संताजी आपल्या वाणीने, लेखणीने, कर्तुत्वाने वैदिक धर्माचे, गीता धर्माचे पूर्ण जीवन भर समाजाच्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.यातील एक महान संत म्हणजे श्री. संताजी जगनाडे महाराज यांना संताजी महाराज म्हणूनही ओळखले जाते. संताजी महाराज हे तुकाराम महाराजाचे शिष्य होते. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज ८ डिसेम्बर १६२४ रोजी तेली समाजात झाला. त्यांचा मुळ गाव महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्यातल्या मावळ तालुक्यातील संदुबे या गावी झाले. आज या ठिकाणी श्री. संत जगणाडे महाराजाची समाधी व स्मारक उभे केले आहे.
संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा समाज कान्ठ्कानी इंदायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सर्व गाथा संताजी महाराजांना मुखादेन म्हणजे तोंड पाठ होती. म्हणून तुकारामांनी लिहिलेली गाथा जशी होती तशी त्यांनी ते पुन्हा लिहून काढली. संत तुकाराम महाराजांची मुखातून लिहिणारे अभंग आपल्या लेखणीने टिपून होत असत. संत तुकाराम महाराजाची गाथा जेव्हा इंद्रायणी नदीत समाज कंठकानी बुडवून दिले. तेव्हा संताजी महाराजांनी तेरा दिवसात ती अभंग गाथा जशीच्या तशी तुकारामाच्या स्वाधीन केली. अशाप्रकारे संत तुकाराम महाराजाच्या विचाराणा महान कार्य श्री. संत संताजी जगनाडे महाराजांनी केली.
एवढ्या मोठ्या थोर संताची तेली समाजात आठवण व्हावी व त्यांच्या प्रेरणेतून आपल्या समाजाला खूप काही घेणे असल्याने व तेली समाजाला जागृत संस्कृत करण्याचे काम गावागावातील तेली समाज संघटना केली पाहिजे, असे आवाहन श्री. प्रमोदजी पिपरे केले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा विदर्भ महिला आघाडी उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, प्रकाशजी गेडाम, डॉ. गजाननजी बुरांडे, रमेशजी भुरसे, धनेशजी कुकडे, वामनजी क्षीरसागर, श्रावणजी बोबाटे, भाऊराव सोमणकर, भास्कर नैताम, सुधाकर नैताम, अतुल चलाख, रमेश नैताम, जीवन बुरांडे, केतन भांडेकर व बहुसंख्येने तेली समाज उपस्थित होते.







