विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी शहरातील प्रतिष्ठित नागरिक अनिल कत्रोजवार यांचे चिरंजीव संकेत यांचे अहेरी शहरातील श्रीनिवास कविराजवार यांची कन्या वैष्णवी यांचा विवाह हॉटेल राजवाडा गेट चंद्रपूर येते संपन्न झाला.
काल इंडियन फॅक्शन हॉल महागाव रोड भुजंगरावपेठा येथे स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला कत्रोजवार व कविराजवार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं, काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र निरीक्षक व माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवर यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, लक्ष्मण आत्राम, प्रमोद गोडसेलवारसह दोन्ही परिवारातील सदस्य तसेच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.







