विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीचक येथे जय गुरुदेव नाट्य कला मंडळ मौशीचक यांच्या सौजन्याने ‘नशीब’ या नाटकाचे आयोजन 8 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्षभर बळीराजा शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणुन आज मौशीचक येथे जय गुरुदेव नाट्य कला मंडळ मौशीचक यांच्या सौजन्याने “नशीब” या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, कुमोद वाघाडे, ज्ञानेश्वर ठाकरे, कृष्णा झंजाळ, अक्षय चिंचोलकर, देवराव हुलके, अनंत हुलके, प्रफुल देशमुख, प्रशांत चापले, अविनाश ठाकरे, देवानंद सालोरकर, विनोद चापले, महेश तिवाडे, रोशन ठाकरे, शैलेश चिंचोलकर, सत्यवान कोहपरे, गणपत चापले, किशोर देशमुख आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







