Home गडचिरोली जनतेने महायुतीला सहकार्य करावे

जनतेने महायुतीला सहकार्य करावे

76

– भाजपा जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन

– पोर्ला येथे लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी अनेक जनकल्याणकारी योजना व ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत.तसेच राज्यातील महायुवती सरकारने महिलांनसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बेटी बचाव बेटी पढाओ योजना, सुकन्या योजना, किशोरी शक्ती योजना, पंतप्रधान मातृशक्ती योजना लखपती दीदी योजना अशा अनेक जनकल्याणकारी योजना भाजपा व महायुती सरकारने अमलात आणलेल्या आहेत. महिलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार नेहमी प्रयत्न करीत आहे. याकरिता कमळाला मतदान करून महायुतीची सरकार सत्येत आणावे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले.

भाजपा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात पोर्ला येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ) यांच्या लाडक्या बहिणींचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी लाडक्या बहिणींना मार्गदर्शन करताना योगीताताई पिपरे बोलत होत्या.

याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी पंचाईत समिती सभापती मारोतरावजी इचोडकर, भाजपा जिल्हा सचिव तथा माजी पं. स. उपसभापती विलासजी दशमुखे यांनी लाडक्या बहिणींना मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी पं. स. सभापती मारोतरावजी इचोडकर, माजी पं. स. उपसभापती विलासभाऊ दशमुखे, माजी पं. स. सदस्या जास्वंदाताई गेडाम, अनिल चापले, अशोक करणेवार, रवी सेलोटे, संजय चापले, अजय चापले, गणपत चौधरी, दादाजी दशमुखे, मनोहर राऊत, गीता चापले, भारती सहारे, निर्मला सदोकर तसेच लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे यांनी केले.

error: Content is protected !!