Home गडचिरोली गडचिरोली मतदारसंघात भाजपाकडून डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी

गडचिरोली मतदारसंघात भाजपाकडून डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी

94
Oplus_131072

– विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांचा पत्ता कट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विधानसभा निवडणूक २०२४ च्या संग्रामात गडचिरोली मतदारसंघातील उमेदवारीबाबत भाजपाकडून सस्पेन्स कायम होता. अखेर हा तिढा सुटला असून या क्षेत्रातून भाजपाकडून डॉ. मिलिंद नरोटे यांना दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर झाली आहे.

गडचिरोली विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. मिलिंद नरोटे व डॉ. नामदेव उसेंडी यांचे नाव पुढे येत होती. या निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळेल या आशेत असलेल्या विद्यमान आमदार डॉ. होळी यांचा पत्ता कट करीत भाजपाने डॉ. नरोटे यांना उमेदवारी अखेर आज जाहीर केली. त्यामुळे होळी यांच्या गोटात अस्वस्तता दिसून येत आहे तर डॉ. नरोटे यांना पहिल्याच प्रयत्नात भाजपाकडून उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या गोटात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नवा चेहरा म्हणून डॉ. मिलिंद नरोटे यांना भाजपाने संधी दिली आहे.

error: Content is protected !!