विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : देसाईगंज बसस्थानक बांधकामाची पाहणी 25 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेञाचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
देसाईगंज बसस्थानकाचा तिढा बर्याच दिवसापासून सुटला नव्हता. गेल्या ५० वर्षापासुन शहरवासियांची मागणी अनेक प्रयत्नांनंतर पुर्ण झाली असल्याने प्रवास्यांना अडचण होणार नाही.सदर बांधकामाचे कंञाट भगवती कंस्ट्रक्शन गोंदिया यांना मिळाले असून हे बांधकाम ४ कोटी रुपये खर्च करुन पुर्ण होणार असून या बसस्थानक बांधकामात बसचालक, वाहक यांच्या थांब्याच्या सोयीसह दुकानाचे गाडे शौच्छालय इत्यादी बांधकाम ही होणार आहे.
सदर बसस्थानक बांधकामामुळे प्रवास्यांना सोयी सुविधा पुरविल्याचा आनंद होत असून सदर बांधकाम आजचा स्तिथीत अर्ध्यावर पूर्ण झाले आहे. व्यवस्तीत आणि नियोजित वेळेत कंञाटदाराने काम पुर्ण करण्याचे निर्देशही याप्रसंगी आ. गजबे यांनी दिले.







