लक्ष्मीनगर येथे नवरात्र उत्सवाची सांगता

72

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील आरमोरी मार्गावरील लक्ष्मीनगर येथे नऊ दिवस नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दांडिया नृत्य सादर करून महिलांनी आनंद घेतला. या उत्सवाची शनिवार, १२ ऑक्टोबरला सांगता झाली.

नऊ दिवस दुर्गादेवीच्या प्रतिमेचे पूजन करून महिलांनी वर्तुळाकार फेर धरून दांडिया नृत्य सादर केले. नाच, गाणे सादर करून नवरात्र उत्सवात महिला व लहान मुला – मुलींनी सहभाग घेतला. नवरात्र उत्सवासाठी प्रामुख्याने पुष्पा तिडके, रूपाली कोल्हे, गीता माटेटवार, कल्याणी धाईत, शालिनी धारणे, स्नेहा शेंडे, विभा येरणे, प्रतिभा ठाकरे, दिपाली मुनगंटीवार, वर्षा प्यारमवार, रेश्मा एमप्रेडीवार, किर्ती कोतपल्लीवार, वैशाली वलादी, दिपाली उपरीकर, वंदना बिसेन, चैताली बुरडे, मेघा खंडारे, वृषाली पोरेड्डीवार, पल्लवी घुमडेलवार, कांचन चौधरी, नंदा कांबळे, सोनाली सलोटे, वर्षा कोवे, मनीषा लाकडे, स्वाती आखाडे, हेमिता अंबादे, राखी चिलवारवार, अरुणा चन्नावार, शुभांगी पिसे, नीलिमा जनबंधू आदी महिलांनी पुढाकार घेतला. नवरात्र उत्सवा दरम्यान वार्डातील सर्वांसाठी भोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला. यशस्वीतेसाठी लक्ष्मीनगर वार्डातील नागरिकांनी सहकार्य केले.