Home गडचिरोली रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीतर्फे ॲक्युप्रेशर व फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीतर्फे ॲक्युप्रेशर व फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करीत आहोत. सुदृढ शरीरयष्टी व निरोगी आयुष्य राखण्याकरिता रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीद्वारा ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्थान जोधपूर राजस्थानचे विशेषज्ञ तथा फिजिओथेरपीस्ट नॅचरोपॅथी रिसर्च ट्रीटमेंट जोधपूर, थेरापिस्ट राजेंद्र सारण व चमू जोधपूर यांना गडचिरोलीमध्ये नाम मात्र शुल्कात ‘नर सेवा’ उपक्रम अंतर्गत लोकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याचा मानस राबवित आहेत.

१९ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या पाच दिवसादरम्यान साई मंदिर, डॉक्टर कुंभारे हॉस्पिटल मागे चामोर्शि रोड गडचिरोली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य उद्घाटन म्हणून डॉ. सोनल चेतन कोवे तर प्रमुख अतिथी डॉ. मिलिंद रामजी नरोटे, डॉ. चेतन मारोती कोवे. रोटरीयन चार्टर्ड अध्यक्ष दिवाकर बारसागडे, माजी अध्यक्ष नंदकिशोर काबरा, रोटरी क्लब अध्यक्ष सुनिल बट्टूवार, सचिव विश्राम होकम, कोषाध्यक्ष नीरज जैन, रोटरियन राजूभाऊ ईटणकर, केतनभाई कलारिया, अमित सूचक, हेमंत राठी, गोविंद सारडा, सचिन तंगडपल्लीवार आदी उपस्थित होते.

जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गडचिरोली द्वारा करण्यात आले आहे.

error: Content is protected !!