– महिलांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निर्णय स्वागतार्ह
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, मातृ शक्तीचा, नारीशक्तीच्या सन्मानाासाठी भारतीय जनता पार्टी, भाजपा महिला मोर्चा गडचिरोली व भाजपा तालुका धानोरा च्या वतीने आज १६ सप्टेंबर २०२४ रोजी भव्य महिला मेळावा किसान भवन धानोरा येथे आयोजित करण्यात आले होते.
या भव्य महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी बोलताना म्हणाले, महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अस्तित्वात आणली. या योजनेमुळे आपले सरकार, कामगिरी दमदार महिला भगिनींच्या भक्कमपणे पाठीशी व महिलांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा स्वागत करतोय. या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी सरकारने घेतलेले निर्णय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मा. खा. अशोकजी नेते यांनी या भव्य महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.
पुढे बोलताना अतिशय भव्य महिला मेळावा धानोरा या ठिकाणी आयोजित केला.या मेळाव्याला महिला भगिनींना मी शुभेच्छा देतो. याबरोबरच मि माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विकासाभिमुख कामे केली आहेत, शासनाच्या योजनाची माहिती देत, केंद्र व राज्य सरकार सुद्धा महिलांसाठी अनेक योजना अस्तित्वात आणून कार्यान्वित केले आहे. लोकसभेत मी अनेक प्रश्न मांडून जनतेच्या सेवेसाठी अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहे. यापुढेही मी जनतेच्या सेवेत तत्पर राहील.तसेच महिलां भगिनींच्या कोणत्याही समस्या आणि अडीअडचणी असल्यास मी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन. आपण लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो, असे व्यक्त मा. खा. नेते यांनी केले.
या सोबतच गडचिरोली, चामोर्शी व धानोरा या ठिकाणी महिलांच्या मदती करिता व महिला भगिनीं ना धावपळ होऊन त्रास होऊ नये याकरिता कार्यालय खोलण्यात आले. जे महिला अजूनही अपात्र आहेत अशा महिलांनी कार्यालयाशी संपर्क साधावा व याचा पुरेपुर महिलांनी लाभ घ्यावा, असे यावेळी मा. खा. नेते यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्तव्य केले. अशोकजी नेते यांचेकडून या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक महिला भगिनीं लाडक्या बहिणीला गिफ्ट सुद्धा देण्यात आले.
यावेळी मंचावर मेळाव्याचे उद्घाटक माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, चंद्रपूर- गडचिरोली लोकसभेचे संयोजक शोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा वैशालीताई चोपडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा शालिनीताई डोंगरे, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंदजी नरोटे, डॉ. चंदाताई कोडवते, भाजपा धानोरा तालुकाध्यक्षा लताताई पुन्घाटे, नगरसेवक आशिष पिपरे, चातगावचे सरपंच गोपाल उईके, जिल्हा महामंत्री सिमा कन्नाके, ताराबाई कोटरंगे, ता. महामंत्री विजय कुमरे, नगरसेवक संजय कुंडू, साजन गुंडावार, राकेश दास, गणेश भूपतवार, राकेश खरवडे, सुभाष धाईत, लंकेश म्हशाखेत्री, सुभाष खोबरे, सुगंधाबाई उईके, भुपाला परचाके, प्रतिषा गुंडावार, किर्ती खरवडे, भारती खोब्रागडे, तसेच मोठया संख्येने महिला भगिनीं व कार्यकर्ते उपस्थित होते.







