– मोहटोला येथील शिवसैनिक दिलीप मडावी यांच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू
– शिवसैनिकाच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मोहटोला येथील शिवसेना (उबाठा) चे शिवसैनिक दिलीप मडावी यांच्या अर्धांगीणी निर्मलाबाई मडावी यांचा संर्पदंशाने मृत्यू झाला. घरातील कर्त्या महिलेच्या मृत्यूमुळे कुटुंबावर आघात कोसळला आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मोहटोला येथे जाऊन मडावी कुटूंबियांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना आर्थिक मदत करून मा. उध्दवसाहेब ठाकरे यांची शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असा धीर आपल्या शिवसैनिकाला दिला.
अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, मानवता खरा धर्म आहे. संतांनी आपल्या आचार विचार व तत्वज्ञानातून मायमराठी भूमित भक्तीचे नंदवन फुलविले. जातिभेदाच्या तटभिंती उध्दवस्त केल्या. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी भागवत धर्माची पुर्नस्थापना केली आणि याच धर्माने जीवन जगण्याचे संदर्भ शिकविले. कठीण प्रसंगी गरजवतांच्या मदतीला धावून जाणे खरा मानवधर्म आहे. निर्मलाबाई या घरीच असतांना सर्पदंश होऊन त्यांचा मृत्यू झाला ही अनपेक्षीत दुदैवी घटना आहे. त्या घरातील कमावत्या महिल्या होत्या. सर्पदंशाने झालेल्या त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे पती दिलीप मडावी व त्यांच्या कुटुंबावर आघात कोसळला आहे. कुटुंबाची झालेली हानी भरून न निघणारी आहे. संपुर्ण शिवसैनिक मडावी कुटुंबाच्या पाठीशी आहे. शासनाकडून कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल. तसेच मडावी कुटुंबाला कोणत्याही मदतीची गरज भासल्यास आपण सदैव तत्पर असल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार याप्रसंगी म्हणाले.
यावेळी उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, प्रशांत ठाकूर, अमित बानबले, संदिप भुरसे, दिलीप मडावी (पती), सुभाष मडावी (मुलगा), निलेश्वर होळी, गुरुदेव सुर्यवंशी, महेश बानबले, उद्धव मडावी, रामभाऊ बानबले, हिरासिंग होळी, तुळशिराम भोयर, अविनाश मडावी, देवेंद्र भोयर, उष्टूजी नैताम, नानाजी किरंगे, रमेश किरंगे, टिकाराम झोळे, अशोक कुनघाडकर, भाष्कर भुरसे, विनोद चापळे, मोहन कुकडकार, छत्रपती भैसारे, मेघश्याम उंदिरवाडे, विलास उंदिरवाडे, तानबाजी उंदिरवाडे, गणेश बाबनवाडे, रामदास बह्याळ, शामराव झोळे, मधुकर बावणे, शामसुंदर कावळे, तेजस धंदरे, अमित हुलके, निकेश मडावी, प्रशांत ठाकूर, विकास उंदिरवाडे, दिलीप वलादे, सुरेश कोलते, तुकाराम होळी, लोमेश कुमरे, मयुर भोयर, चेतन लोणारे, खुशाल कारेते, अंकुश झोळे आदी गावकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







