तरुणीस बेदम मारहाण करणाऱ्या आरोपिंना कठोर शिक्षा करा

26

– आ. कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे ठाणेदारांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान सोहेल शेख, अयुब शेख या दोन आरोपींनी आरमोरी येथील शिवम रेस्टॉरंट मधील युवतीस क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. या आरोपींना कठोर सजा देण्यात यावी व इतर मागण्यांसाठी आ.कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठाणेदार आरमोरी यांना निवेदन दिले.

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आरमोरी शहरातील रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या मुलीवर प्राण घातक हल्ला करण्यात आला. सदर पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ठाण्यात आरोपीविरोधात वाढीव कलम लावण्यात यावी. तसेच आरोपींचे इतर साथीदार मोकळे असल्याने पीडितेवर अत्याचार होण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी व आरमोरी शहरात भविष्यात असे प्रकारचे कृती होणार नाही याबाबत आरोपीवर व कठोर कारवाई करण्यात आदी मागण्यांची निवेदन ठाणेदारांना देण्यात आले.

ठाणेदार यांना निवेदन देतेवेळी आ. कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, न. प. आरोग्य सभापति भारत बावनथडे, शहर तालुकाध्यक्ष विलास पारधी, नितीन जोध, विश्व हिंदू परिषदेचे शंकर बोरकर, बजरंग दलाचे अमन गायकवाड, शुभम निंबेकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अर्चना गोंदोळे, नारायण धकाते, संतोष गोंडोळे, राष्ट्रवादीचे संदीप ठाकूर, काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय सुपारे, सुधीर सपाटे, कुणाल पिल्लारे, राहुल तितीरमारे, सुरज कारकुरवार, अमनसिंग गहीरवार, लकी सोनेकर शुभम चीचघरे ,पवन कुकडकर, रमेश निंबेकर, चंद्रशेखर चीजघरे, धीरज बोधलकार, निहाल बोधलकर, पियुष सोनटक्के, कुणाल पिलारे, वनमाळी,यासहित सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.