कारवाफा पोलीस मदत केंद्रात स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम

27

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पोलीस मदत केंद्र कारवाफा येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक एस. आर. सोनावणे, कारवाफा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनिता शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कैलास वाळके, जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संध्या मोंढे, कारवाफा शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विष्णू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कारवाफा शासकीय आश्रम शाळेचे माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीची माहिती दिली. शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. देशात निर्माण झालेल्या समस्या व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्याअंगी बळ निर्माण करण्याचे तसेच संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा योग्य वापर करून भारत देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे यांनी स्फूर्तीगीत सादर केले. यावेळी समीक्षा उसेंडी, सुरेखा कुमोटी, सार्थक कदम, वैष्णवी कदम या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन अनिकेत धोटे व विश्वभारती जाधव यांनी केले. कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळा, राजीव गांधी विद्यालय, लालशहा मडावी, विद्यालयाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, कर्मचारी,नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.