Home गडचिरोली आगामी विधानसभेत विजयाचा संकल्प करून कार्यकर्त्यांनी काम करावे : अशोकजी नेते

आगामी विधानसभेत विजयाचा संकल्प करून कार्यकर्त्यांनी काम करावे : अशोकजी नेते

105

– माजी आमदार प्रा.अतुलजी देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रह्मपुरीत भाजपा कार्यकर्ता महामेळावा

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी विधानसभा आयोजित भाजपाचे नेते, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्ता महामेळाव्याचे आयोजन नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय सभागृह ब्रह्मपुरी येथे‌ आयोजित करण्यात आले होते.

या कार्यकर्ता मेळाव्याला मा. खा. तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, झालेल्या लोकसभेत जरी पराजय झाला असेल तरी कार्यकर्ते यांनी पराजयाला खचून न जाता आगामी येणाऱ्या विधानसभेत विजयाचा संकल्प करुनच कार्यकर्त्यांनी काम करावे. लोकसभेत मतदारांची दिशाभुल व खोटा प्रचार करून काँग्रेसनी विजय केला. यात संविधान बदलविणार व महिलांच्या खात्यात महिण्याला साडेआठ हजार रूपये खटाखट देऊ अशा पद्धतीचे खोटे नाटे आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केले. काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नव्हते, विकास कामाचे व्हिजन नाही. भाजपा हे विकासाचे राजकारण करते. येणाऱ्या विधानसभेत कार्यकर्ते यांनी विजयाचा संकल्प घेऊन प्रत्येक बुथावर मतदारांच्या यादीचे वाचन करत कार्यकर्ते यांनी प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन केंद्र व राज्य सरकारचे विकासकामे सांगावे. मला लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करून काम केले. अशा कार्यकर्त्यांचे व सर्व मतदारांचे आभार मानतो. दोन दिवसांनी लोकनेते विकासपुरुष ना. सुधिरभाऊ चा व आज अतुलभाऊ यांचा वाढदिवस आहे. या निमित्त दिर्घ आयुष्याच्या उदंड कोटी कोटी शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी मा. खा. अशोक नेते यांनी केले.

वने मंत्री ना. श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नांने सावली तालुक्यात यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेत मोठ्या संख्येनी मंजूर केल्याबद्दल तालुक्याच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण घरकुल वसाहत या योजनेतून ढिवर व एन. टी. समाजाला सावली तालुक्यात मोठ्या संख्येनी घरकुल मिळवून दिल्याबद्दल वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे भाजपा सावली तालुक्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले.

माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भाजपा कार्यकर्ता महा मेळाव्याला प्रामुख्याने वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार, माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, सत्कारमुर्ती माजी आमदार अतुल भाऊ देशकर, माजी आमदार सुधीरजी पारवे, माहिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेडे, माजी जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनूले, प्रा. गोपीचंद गणवीर, काशीनाथजी थेरकर, प्रा. कादर शेख, प्रकाशजी वाघमारे, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष अरुणजी शेंडे, शहराध्यक्ष अरविंदजी नांदूरकर, शिंदेवाही तालुकाध्यक्ष राजुभाऊ बोरकर, सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, माजी जि. प. उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे, माजी सभापती संतोषभाऊ तंगडपल्लीवार, माजी सभापती नागराज गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री तथा माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे, भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर, महिला आघाडी जिल्हा महामंत्री निलम सुरमवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलालजी दोनाडकर, प्रा. सुयोग बाळबुधे, मनोज भुपाल, मनोज वठे, रशमीताई पेशने, स्वप्निल अलगदेवे, तसेच मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!