अरविंद कात्रटवार यांच्या नियुक्तीने शिवसेनेत नवचैतन्य

168

– शिवसैनिकांनी केला सत्कार

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेनेचे धडाडीचे, कार्यकुशल व कार्यतत्पर नेते अरविंद कात्रटवार यांची शिवसेनेच्या जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सहा तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. या नियुक्तीबद्दल जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यासह शिवसैनिकांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीबद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, माजी नगराध्यक्ष महेंद्रकुमार मोहबंशी, भरत जोशी, विकास प्रधान, नंदू चावला, आशीष काळे, पुंडलिक देशमुख, जयेंद्र चंदेल, खुशाल बन्सोड, निरांजनी चंदेल, अनिता बोरकर, युवती सेना जिल्हाप्रमुख उमा चंदेल, सज्जू सय्यद, राहत सय्यद यांनी सत्कार करून अभिनंदन केले.