– कीर्तन, काकड आरती, रामधून, ग्राम स्वच्छता अभियान आदी उपक्रमही पडले पार
गडचिरोली : कार्तिक एकादशी निमित्ताने कुराडी येथे गोपालकाला व महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. गोपालकाला डॉ. राजेंद्र पा. मुनघाटे यांचे हस्ते गडचिरोली पंचायत समिती उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपा तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, डोमाजी पा. मुनघाटे, अनिल शेडमाके आदी उपस्थित होते. कुराडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा 15 नोव्हेंबरला घटस्थापना प्रभाकरजी बारसागडे यांचे हस्ते पार पडली तर गुरुदेव सेवा मंडळ साखरा, नवरगाव, चुरचुरा यांचे भजन, ह. भ. प. सौ. कन्याकुमारी भाऊराव चांदेकर आंबोरा यांचे कीर्तन ह. भ. प. किनेकर महाराज, ह. भ. प. भोयर महाराज, मिराबाई वाघाडे, मुकुंदाजी कोलते यांचे उपस्थितीत पार पडला. काकड आरती, रामधून ग्राम स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविण्यात आले.