महागाई विरोधात काँग्रेसचे जनजागरण अभियान

137

– मुलचेरातून अभियानाला सुरुवात

गडचिरोली : वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य नागरिकांचा केंद्र सरकार विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी देशभरात काँग्रेसतर्फे जनजागरण अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा 14 नोव्हेंबर पासून पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीचे औचित्य साधून मुलचेरा तालुक्यातून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. मुलचेरा तालुक्यात काँग्रेसतर्फे आयोजित या अभियानाचे नेतृत्व काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवडे यांनी केले. यावेळी डॉ. नामदेव किरसान गडचिरोली जिल्हा प्रभारी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जि. प. सदस्य रवींद्र शहा, पंचायत सभापती सुवर्णा येमुलवार, युवक काँगेसचे तालुका अध्यक्ष शुभम शेंडे, शंकर हलदार, बर्मन, श्यामल पाल, हरिपद पांडे, आंबटपल्लीचे सरपंच उमेश कडते, ग्रामपंचायत सदस्य गणेश तलांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका मुख्यालयातील सांस्कृतिक भवन येथे तालुका काँग्रेस तर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करून जनजागरण अभियान बाबत आपले मत व्यक्त करून काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या अभियानाची रुपरेशा समजावून सांगण्यात आली. त्यानंतर तालुका मुख्यालयात मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार मुर्दाबाद, बढती महगाई कम करो, अशा घोषणा देण्यात आले.