आमदार कृष्णाजी गजबे यांनी एस. टी. बस कर्मचाऱ्यांच्या आंंदोलनाला दिली भेट

127

– कर्मचाऱ्यांच्या जाणल्या समस्या

गडचिरोली : एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणे, 7 वा वेतन आयोग लागू करणेे व ईतर न्याय मागण्यांंकरिता गडचिरोली आगार येथे एस. टी. कर्मचा-यांंनी बेमुदत संप, आंदोलन सुरू केले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार  कृष्णाजी गजबे यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या मागण्या एकूण घेऊन त्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार गजबे यांनी सांगितले. अत्यंत कमी वेतन असतानाही अहोरात्र मेहनत घेऊन चालक, वाहक नागरिकांना चांगली सेवा देत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना कोणत्याही सोयी- सुविधा व भत्ते मिळत नाहीत हा तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आ. गजबे यांनी दिली. यावेळी गडचिरोली परिवहन आगारातील चालक, वाहक, लिपिक तथा महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.