‘वाटचाल विकासाची’ या पुस्तिकेचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या हस्ते प्रकाशन

145

– नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या ५ वर्षांतील कार्यकाळात झालेल्या विकास कामावर आधारित पुस्तिका

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे गोंडवाना सैनिकी विद्यालय चामोर्शी रोड (वाकडी) गडचिरोली येथे १२, १३ व १४ नोव्हेंबर असे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्ग पार पडले. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप भाजपचे  विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी गडचिरोली शहराच्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या ५ वर्षांंतील कार्यकाळात २९८ कोटी रुपयांचे विकास कामे उदा. भूमिगत गटार योजना, नगरपरिषद प्राथमिक शालेंचे बांधकाम, सुभास वार्ड व विसापूर येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम, वाढीव पाईप लाईन, आठवडी बाजारातील दुकान गाळे, शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रेट रस्ते व नाली बांधकाम, शहरातील सर्व विद्युत पोलवर एल ई डी लाईट, स्मशानभूमीचा विकास व शहरातील खुल्या जागेचे सौन्द्र्यीकरन, आत्याधुनिक अग्निशमन गाडीची व्यवस्था, प्रत्येक प्रभागात सार्वजनिक शौचालय, इत्यादी विकास कामे या ३० वर्षाच्या कार्यकाळात जे झाली नाहीत ती कामे या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या कार्यकाळात विकास कामे झालेली आहेत. याच शहरातील विकासकामावर आधारित ‘वाटचाल विकासाची’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज, १४ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. याप्रसंगी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, रविंद्रजी ओल्लारवार, प्रशांतजी वाघरे, गोविंदजी सारडा, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, शहर अध्यक्ष सागर कुमरे, जि. प. चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडापे, जिप सदस्य लताताई पुंघाटे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गात विविध मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रशिक्षण प्रमुख अनिल पोहनकर, तर प्रास्ताविक रमेशजी भुरसे यांनी केले. या प्रशिक्षण वर्गात २०० च्या वर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रशिक्षणाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.