एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलनिकरण करण्यासाठी प्रयत्नशील – खासदार अशोक नेते

132

– राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना भेटून विलनिकरनाची मागणी करणार

– खा.अशोक नेते यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आश्वासन

गडचिरोली : एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरन, 7 वा वेतन आयोग लागू करने,ईतर न्याय मागण्या करीता गडचिरोली आगार येथे एस.टि.कर्मचा-यानी बेमुदत संप,आंदोलन सुरू केले आहे. आज दि. 30 ऑक्टोबर रोजी भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप व धरणे आंदोलनाला भेट दिली व त्यांच्या मागण्या एकूण घेऊन त्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सदर मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, अत्यंत कमी वेतन असतांनाही अहोरात्र मेहनत घेऊन चालक, वाहक नागरिकांना चांगली सेवा देत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना कोणत्याही सोयी- सुविधा व भत्ते मिळत नाहीत हा तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनिकरण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. याप्रसंगी आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या हलाखीच्या जीवनावर व प्रतिकूल परिस्थितीवर मोलाचे मार्गदर्शन केले. या आंदोलनात गडचिरोली परिवहन आगारातील चालक, वाहक, लिपिक तथा महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.