गडचिरोली शहरातील मुख्य रस्ता व महामार्गावरील फुटपाथचे अतिक्रमण हटविण्यासाठी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर आक्रमक

142

– फुटपाथ दुकानदारांना स्थायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

– मुख्यधिकारी विशाल वाघ व नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांना दिले निवेदन

गडचिरोली : शहरातील मुख्य रस्त्यावर व महामार्गावरील वाढणारे अतिक्रमण नागरिकांच्या जीवावर उठत असुन गेल्या पंधरवड्यात ३ ते ४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे नगरपरिषद व जिल्हा प्रशानाला जागे करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहरातील नगरसेवक व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या मार्गदर्शनात भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, शहर अध्यक्ष तथा सभापती मुक्तेश्वर काटवे, जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या नेतृत्वात स्थानिक नगरपरिषदेच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन व निदर्शने करण्यात आली. गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथचे अतिक्रमण काढून फुटपाथ दुकानदारांना स्थायी जागा उपलब्ध करून देण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी विशाल वाघ व नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांना देण्यात आले. आंदोलनाला महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, शहर अध्यक्ष कविताताई उरकूडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, शहर महामंत्री तथा नगरसेवक केशव निंबोड, नगरसेविका वैष्णवीताई नैताम, निताताई उंदिरवाडे, कोमल बारसागडे, लताताई लाटकर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर, जनार्धन भांडेकर, राजू शेरकी, श्याम वाढई, रामन्ना बोण्डकुलवार भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.