गडचिरोली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पडली पार

153

– १६.५ कोटींच्या ९८ कामांंना मंजुरी

– शहर विकासासाठी असलेले अनेक विषय सर्वानुमते मंजुर

गडचिरोली : स्थानिक नगरपरिषद येथे नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ११ नोव्हेंबरला सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेमध्ये शहरातील विविध वार्डात १६.५ कोटींच्या एकूण ९८ कामांंना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यामध्ये नगरपरिषद प्राथमिक शाळा रामपूर इमारतीचे १.२ कोटींच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आलेली असुन लवकरच बांधकामाला सुरुवात आहे. तसेच ही सभा खेळीमेळीच्या वातावरनात पार पडली. या सभेमध्ये नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नियोजन करण्यात आले, शहर उपजीविका केंद्राकरिता इमारतीचे बांधकाम करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली, आठवडी बाजार येथील नवीन बांधकाम करण्यात आलेले दुकान गाळ्यांचा लिलाव करणे, नगरभवनाचे लोकार्पण करून किरायाने देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आले, नगरपरिषद मार्फत शहराचा सर्वांगीक विकास करण्याकरिता शहरातील जागा/जमीन वन विभाग, महसुल विभाग व जिल्हा परिषद यांच्याकडे जागा मागणी प्रस्ताव मंजूर करण्यात आला, सन २०२१-२२ करिता पाणी पुरवठा विभागास लागणारे साहित्याच्या कामाकरिता निविदा बोलविण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली, भूमिगत गटार योजनेतील नगर परिषदेच्या नवीन बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांखाली दबलेले चेंबर वर-खाली करण्याकरीता वार्षिक निविदा काढणेबाबत निर्णय घेण्यात आला. नगर परिषद कार्यालयीन सफाई कामगारांना व कार्यालयीन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेष व रेनकोट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला, विविध योजनेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी ९ मीटर हायमास्ट प्रस्तावित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला, शहरातील नवीन बांधण्यात आलेले राष्ट्रीय महामार्ग दुभाजकाची उंची वाढविणे व सौन्दर्यीकरण करणे, नगरपरिषद विविध विभागांतर्गत बोलाविण्यात आलेल्या निविदांपैकी सर्वात कमी दराच्या पात्र निविदेला मंजुरी प्रदान करणे, तसेच फुटपाथ वरील अतिक्रमण काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी सभेला मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सभापती मुक्तेश्वर काटवे, प्रवीण वाघरे, वर्षा नैताम, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नंदकिशोर काबरा, केशव निंबोड, नगरसेविका वैष्णवी नैताम, माधुरी खोब्रागडे, लता लाटकर, नीता उंदिरवाडे, अल्का पोहणकर, रितू कोलते, रंजना गेडाम, नितीन उंदिरवाडे, वर्षा बट्टे, अनिता विसरोजवार, सतीश विधाते, रमेश चौधरी, भुपेश कुळमेथे, मंजुषा आखाडे, आनंद शृंगारपवार, संजय मेश्राम, पुजा बोबाटे, गीता पोटावी, गुलाब मडावी व नगरपरिषद येथील विभाग प्रमुख उपस्थित होते.