स्व. सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव येथे वृक्षारोपण

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्व. सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव येथे तिन्ही आश्रमशाळांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष गोवर्धनजी चव्हाण होते तर विशेष अतिथी म्हणून संघर्ष वाहिनीचे संचालक, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या कल्याणाकरिता अहोरात्र झटणारे सामाजिक कार्यकर्ते दिनानाथजी वाघमारे, तसेच प्रभारी प्राचार्य विनोद चव्हाण उपस्थित होते, याप्रसंगी अध्यक्षांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठीच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार किशोर वावरे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य केले.