समाजाचे ऋण फेडण्याची हीच खरी संधी – महेंद्र ब्राम्हणवाडे

177

गडचिरोली : आपला मुलगा शासकीय सेवेत दाखल व्हावा, आपल्याला शेवटच्या टप्प्यात मुलाने संगोपन करावे, अशी अपेक्षा सर्वसामान्यपणे सर्वच पालकांना असते. मात्र ही अपेक्षा भंग होताना दिसते. याला अपवाद सीमेवर जाऊन देशसेवा करणाऱ्या शुभाष हुलके या उमद्या युवकाने समाजसेवेचे घेतलेले व्रत खऱ्या अर्थाने समाजाचे ऋण फेडण्याची खरी संधी आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी निराधार महिलांना उन्ही ( स्वेटर) कपडे वितरणाचा कार्यक्रम शिवनी येथे सुकन्या फाऊंडेशन गडचिरोलीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महेंद्र ब्राम्हणवाडे यांची जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवडीबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच किरण ताटपल्लीवार, जि. प. सदस्य वैशाली ताटपल्लीवार, तालुकाध्यक्ष तथा पं. स‌ सदस्य नेताजी गावतुरे, हिरापुरचे उसरपंच दिवाकर मिसार, वसंता राऊत, ढिवरु मेश्राम, समीर ताजने, शिवनीच्या उपसरपंच उषाताई गुरनुले, ग्रा. पं. सदस्य प्रकाश खोब्रागडे, मांजरु जराते, परशुराम गेडाम, बाजीराव चौके, सुधीर बांबोळे, हुलके परिवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवनी येथिल शेकडो निराधार व गरजू महिलांना उन्ही (स्वेटर) कपड्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. हुलके परिवारातील युवकांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी जी तयारी दाखवली आहे ती, जिल्ह्यातील इतर युवकांसाठी प्रेरणा देणारी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.