चामोर्शी तालुक्यातील कृषी पंपाच्या वीज जोडण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या – आ. डॉ. देवराव होळी

95

गडचिराेली : चामोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधवांनी चार – पाच वर्षांपासून वीज जोडणीकरिता
अर्ज करून सुद्धा वीज जोडणी पूर्ण झालेल्या नाहीत. अनेक शेतकरी बांधव वितरण कार्यालयाच्या हेलपाट्या मारीत आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज करून डिमांड भरलेले आहेत. त्यांचे वीज जोडण्या त्वरित पूर्ण करण्यात यावे व ज्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे वीज कनेक्शनची मागणी केली. त्यांना त्वरित डिमांड देण्यात यावे व शेतकरी बांधवांचे वीज जोडण्या त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे व भाजप बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा यांनी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालय येथे निवेदन सादर करून केला. यावेळी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.