दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा – खा. अशोक नेते

166

गडचिराेली : धानोरा तालुक्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात आज, 28 ऑक्टोबर रोजी पार पडली. या बैठकीला प्रामुख्याने भाजपचे आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, पं. स. सभापती अनुसयाताई कोरेटी, ज्येष्ठ नेते साईनाथ साळवे, जि. प. सदस्य लताताई पुंघाटे, तालुका अध्यक्ष शशिकांत साळवे, नायब तहसीलदार वाकुडकर, बीडीओ कोमलवार, नगर पंचायतचे मुख्याधिकारी बेम्बरे,  सर्व विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत घरकुलचा प्रलंबित निधी तत्काळ देणे व शेतकऱ्यांना अतिक्रमणचे पट्टे देणे, कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन देणे, रोहयोची कामे सुरू करणे, शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देणे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देणे इत्यादी अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून ते सोडविण्यासाठी सूचनांचे काटेकोरपने पालन करण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.