नगरपंचायतींसाठी सरासरी 75.41 टक्के मतदान तर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या मतदानाची सरासरी 71.72 टक्के

92

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली :  जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा व कोरची नगरपंंचायतीच्या निवडणुकिकरिता सरासरी 75.41 टक्के मतदान झाले. यात अहेरी नगरपंचायतीकरिता  7501 मतदारांनी (स्त्री – 3767, पुरुष – 3734 मतदार, एकूण टक्केवारी 69.02 ), सिरोंचा नगरपंचायतीकरिता 5022 मतदारांनी (स्त्री – 2480, पुरुष – 2542 मतदार, एकूण टक्केवारी 74.52), एटापल्ली येथे 4729 मतदारांनी (स्त्री – 2358, पुरुष – 2371 मतदार, एकूण टक्केवारी 74.04), भामरागड येथे 2555 मतदारांनी (स्त्री – 1263, पुरुष – 1292 मतदार, एकूण टक्केवारी 67.49), चामोर्शी येथे 7625 मतदारांनी (स्त्री – 3732, पुरुष – 3893 मतदार, एकूण टक्केवारी 78.68), मुलचेरा येथे नगरपंचायतीकरिता दुपारी 3.00 वाजेपर्यंत 1373 मतदारांनी (स्त्री – 699, पुरुष – 674 मतदार, एकूण टक्केवारी 87.73), धानोरा येथे 3197 मतदारांनी (स्त्री – 1679, पुरुष – 1518 मतदार, एकूण टक्केवारी 79.15), कुरखेडा येथे 3659 (स्त्री – 1879, पुरुष – 1780 मतदार, एकूण टक्केवारी 79.25 ), कोरची येथे 2011 (स्त्री – 1056, पुरुष – 955 मतदार, एकूण टक्केवारी 88.86) यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत होती. यात सरासरी 75.41 टक्के मतदान झाले. नऊ नगरपंचायतीच्या प्रभागासाठी निवडणूक घेण्यात आली. मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती नगर परिषद प्रशासन यांनी दिली.

तसेच जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी व सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत  दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 71.72 टक्के मतदान झाले. यात कोरची तालुक्यातील ग्रामपंचायतीकरीता 1123 मतदारांनी (स्त्री – 549, पुरुष – 574 मतदार, एकूण टक्केवारी 81.85),  कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतीकरिता  वाजेपर्यंत 1858 मतदारांनी (स्त्री – 884, पुरुष – 974 मतदार, एकूण टक्केवारी 77.42), देसाईगंज तालुक्यात 654 मतदारांनी (स्त्री – 338, पुरुष – 316 मतदार, एकूण टक्केवारी 84.61), आरमोरी तालुक्यात  1496 मतदारांनी (स्त्री – 744, पुरुष – 752 मतदार, एकूण टक्केवारी 78.49), गडचिरोली तालुक्यात 2873 मतदारांनी (स्त्री – 1408, पुरुष – 1465 मतदार, एकूण टक्केवारी 79.74),  धानोरा तालुक्यात 1541 मतदारांनी (स्त्री – 752, पुरुष – 789 मतदार, एकूण टक्केवारी 71.34) तर चामोर्शी तालुक्यात 5089 मतदारांनी (स्त्री – 2445, पुरुष – 2644 मतदार, एकूण टक्केवारी 75.37), मुलचेरा तालुक्यात 1349 मतदारांनी (स्त्री – 646, पुरुष – 703 मतदार, एकूण टक्केवारी 78.48 ), अहेरी तालुक्यात 5107 मतदारांनी (स्त्री – 2458, पुरुष – 2649 मतदार, एकूण टक्केवारी 65.60), सिरोंचा तालुक्यात 1655 मतदारांनी (स्त्री – 854, पुरुष – 801 मतदार, एकूण टक्केवारी 69.71), मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील ग्रामपंचायतीकरिता प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रा.पं. संख्या एकूण 46 तर प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या जागांची संख्या एकूण 71 अशा प्रभागासाठी निवडणूक घेण्यात आली.