अँग्रोव्हिजन कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांचे आवाहन

120

– २४ ते २७ डिसेंबर दरम्यान नागपूर रेशिमबाग मैदानावर अँग्रोव्हिजनचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : २४ ते २७ डिसेंबर २०२१ या दरम्यान नागपूर रेशिमबाग मैदानावर अँग्रोव्हिजनचे आयोजन करण्यात आले असून या अँग्रोव्हिजन कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन शुक्रवार २४ डिसेंबरला दुपारी १२ वा. रेशीमबाग मैदान, नागपूर येथे केंद्रीय मंत्री ना. श्री. नरेंद्र सिंग तोमर ,मुख्य अतिथी, केंद्रीय मंत्री ना.श्री. पुरुषोत्तम रुपाला, प्रमुख उपस्थिती ना.श्री. देवेंद्र फडणवीस व अँग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या अँग्रोव्हिजनमध्ये अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व होणाऱ्या कृषी प्रदर्शन, शेतीविषयक कार्यशाळा व परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.