महिला महाविद्यालयात भूगोल अभ्यास मंडळाची स्थापना

165

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोलीद्वारा संचालित महिला महाविद्यालय गडचिरोली येथील भूगोल विभागाद्वारे भूगोल अभ्यास मंडळाची स्थापना सत्र २०२१-२२ करिता करण्यात आली. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. लता सावरकर, भूगोल विभाग प्रमुख तथा आयोजक डॉ. योगेश कृष्णराव पाटील, प्रमुख मार्गदर्शक माजी अधिष्ठाता डॉ. नंदाजी सातपुते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. कुंदन दुफारे, डॉ. शरयु गहेरवार, डॉ. प्रमोद बोधाने, डॉ. प्रज्ञा त्रिपाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. योगेश पाटील यांनी केले व भूगोल अभ्यास मंडळाद्वारे घेण्यात येणारे कार्यक्रम जागतिक भूगोल दिन, भौगोलिक सहल, ओझोन दिन, जागतिक पर्यावरण दिन, जागतिक वसुंधरा दिन, जागतिक लोकसंख्या दिन, सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण आदींची माहिती दिली.
भूगोल अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मृणाली लेनगुरे, उपाध्यक्ष भाग्यश्री रामटेके, सचिव संजना किरमे, सहसचिव प्रचिता गावतुरे, कोषाध्यक्ष प्रीती नायबनकर, तर सदस्य म्हणून श्रद्धा जाधव, श्रीदेवी लेनगुरे, मनस्वी मंगरे, काजल चापले, डिंपल बोदलकर, रितू भामरे, दीपाली देवीकर, धनश्री मंडलवार व करिश्मा पुडो यांची निवड करण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. सातपुते यांनी पर्यावरणाची होणारी हानी थांबवित्यासाठी उपाययोजना सूचविल्या. डॉ. बोधाने यांनी इतिहास आणि भूगोल यातील सम्बन्ध आपल्या भाषणातून स्पष्ट केला. डॉ. दुफारे यांनी वनसंपत्ती व वनकायदे यावर विचार व्यक्त केले. प्राचार्य डॉ. सावरकर यांनी भूगोल अभ्यास मंडळाद्वारे अनेक कार्यक्रम हे केवळ नाममात्र न रहता मानवी कल्याणाच्या दृष्टीकोनातून कशा उपयोगी पडतील यावर मार्गदर्शन केले. कार्यकर्माचे संचालन प्रचिता गावतुरे हिने तर आभार प्रदर्शन करिश्मा पुुडो हिने केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. गेडाम, श्री. दागमवार, श्रीमती वाईलकर, श्री. धानोरकार, श्री. भोयर, श्री. ठाकरे, श्री. धुडसे, श्रीमती मडावी यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.