संतोष मेश्राम झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित

67

विदर्भ क्रांती न्यूज

गोंडपिपरी : चंद्रपूर जिल्ह्यातील जे शिक्षक अध्यापनासोबतच साहित्यसेवा करतात. विशेषतः झाडीबोलीच्या संवर्धनासाठी लेखन करतात अशा शिक्षकांचे प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक याप्रमाणे झाडीबोली साहित्य मंडळ शाखा चंद्रपूरच्यावतीने दरवर्षी झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या झाडी शब्दसाधक पुरस्कारासाठी सिंदेवाही तालुक्यातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवणी येथे कार्यरत तथा साहित्यिक असलेले शिक्षक संतोष ग्यानिराम मेश्राम यांची निवड करण्यात आली. १८ सप्टेंबर रोजी कन्यका सभागृह गोंडपिपरी याठिकाणी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मेश्राम यांना हा पुरस्कार प्रदान करण्या आला . संतोष मेश्राम हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मोहरणा येथील रहिवासी असून मागील 20 वर्षांपासून ते साहित्य लेखन करीत आहेत. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवले असून त्यांच्या नावे अस्सल झाडीबोली भाषेतील ग्रामीण जीवनातील गरीब कुटूंबाच्या संघर्षाची कथा असलेला ‘ताटवा’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित असून अजून दोन कवितासंग्रह आणि एक साहित्याशी निगडित मोबाईल अँप प्रकाशनाच्या तयारीत आहेत, शिक्षकी पेशा जपता जपता ते पिंपळाच्या पानावरील कलाकृती, व्हीडिओ एडिटिंग, ग्राफिक्स निर्मिती, ब्लॅकबोर्ड पेंटिंग, गायन, अभिनय आशा अनेक कालागुणांनी विभूषित असून विविध पुरस्काराने सन्मानित आहेत.