अजय कंकडालवार यांनी देवारे कुटुंबियांचे केले सांत्वन

136

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील खमंचेरू येथील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे युवा कार्यकर्ते संतोष देवारे यांचे वडील रागुनाथ देवारे यांची निधन झाले. याची माहिती आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांकडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच खमनचेरू येथील देवारे कुटुंबियांना भेट देऊन आस्तेने विचारपुस करून सांत्वन केले.

यावेळी वांगेपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी, खमनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच शयलू मडावी, माजी सरपंच रमेश पेंदाम, नागेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य व अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे, भामरागड नगरपंचायतचे माजी नगरसेवक सायनु आत्राम, नितीन कोडापे, नरेश गर्गम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.