तेलंगणासह गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांना भूकंपाचे धक्के

111

– भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तेलंगणा राज्यातील शिरपूर, कागजनगर सह गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) व चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल असून जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याची माहिती आहे.
तेलंगणा राज्यातील शिरपूर, कागजनगर या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच महाराष्ट्र राज्यातील
गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील महागाव व चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे.