गोवा येथे संसदीय स्थायी ऊर्जा समितीचा अध्ययन दौरा

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संसदीय स्थायी ऊर्जा समितीचा गोवा येथे तीन दिवसीय अध्ययन दौरा 6 ते 8 जानेवारी दरम्यान सुरू आहे. आज 7 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा संसदीय स्थायी ऊर्जा समितीचे सदस्य, खासदार अशोक नेते यांनी सहभाग नोंदवला व ऊर्जा संबंधीत माहिती जाणून घेतली. तसेच या अध्ययन बैठकीत ऊर्जासंबंधी इतर अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष तसेच इतर सर्व समितीचे सदस्य खासदार उपस्थित होते.