– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची अधिकाऱ्यांना सूचना
– निर्माणाधीन बांधकामाची आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली पाहणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विद्यमान महिला व बाल रूग्णालयावर पडत असलेला आरोग्य सेवेचा अतिरिक्त भार लक्षात घेता नविन बांधकाम सुरू असलेल्या महिला व बाल रूग्णालयाचे वाढीव बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशी सूचना आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी नवीन निर्माणाधीन बांधकामाची पाहणी करताना केली.
यावेळी महीला रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. आखाडे, इंजिनिअर कोहळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी वैद्यकीय महिला व बाल रुग्णालयाची पाहणी केली. १०० बेडेड वाढीव रुग्णालयाच्या बांधकामा संदर्भात काय कारवाई झाली? त्यात काय तांत्रिक अडचणीं आहेत ? याबाबत उपस्थितीतांना विचारना केली. यावेळी काही आवश्यक त्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात व नियोजित वेळेत काम पूर्ण करावे, असे निर्देश दिले.







