– बैठकीला उपस्थित राहण्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे आवाहन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : २३ जून रोजी चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा – तळोधी जिल्हा परिषद क्षेत्राची गणनिहाय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.त
तळोधी पंचायत समिती क्षेत्राअंतर्गत कार्यकर्त्यांची दुपारी २ वाजता ग्रामपंचायत भवन तळोधी येथे बैठक आयोजित करण्यात आली तर कुनघाडा क्षेत्राअंतर्गत पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची बैठक दुपारी ३ वाजता किसान भवन कुनघाडा येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







