Home गडचिरोली विधान परिषदेची १ सीट जिल्ह्यातील ओबीसी वा इतर समाजाला द्या

विधान परिषदेची १ सीट जिल्ह्यातील ओबीसी वा इतर समाजाला द्या

93

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पक्षाकडे केली मागणी

– मागील ३०-४० वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य देण्याची केली विनंती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या ११ जागांची निवड होणार असून त्यामध्ये १ जागा गडचिरोली जिल्ह्याला देऊन मागील ३०-४० वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठेने काम करणाऱ्या ओबीसी व इतर समाजातील नेत्यांना संधी द्यावी, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी वैयक्तिकरित्या पार्टीकडे केली आहे.

गडचिरोली जिल्हा हा लोकसभा व विधानसभेसाठी आदिवासी समाजासाठी आरक्षित असल्याने इतर समाजाच्या नेत्यांना आमदार खासदार होण्याची संधी नाही. तरीही मागील अनेक वर्षांपासून पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. आमदार, खासदार होता आले नाही तरीही ते अत्यंत निष्ठेने पार्टीचे काम करीत आहेत. करिता या विधान परिषदेच्या निमित्ताने १ सीट ओबीसी व इतर समाजातील निष्ठावान कार्यकर्त्यांना द्यावी, अशी वैयक्तिकरित्या मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी पार्टी नेतृत्वाकडे केली आहे.

error: Content is protected !!