विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आरमोरी तालुका क्रीडा संकुल समिती द्वारा आयोजित पतंजली योग परिवार यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन आरमोरी येथील तालुका क्रीडा संकुलचे प्रांगणात सकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांसमवेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी योगाभ्यास केला.
आपले शारीरिक स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी योग अतिशय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी यावेळी केले. याप्रसंगी योगअभ्यास प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.







