विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : तालुक्यातील कोटगल येथे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार व जनतेचे आभार मानण्यासाठी भेट देऊन आपल्या भाषणात प्रचलित राजकीय सामाजिक व आर्थिक स्थितीची जाणीव करून देऊन लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस कमिटी गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत पाटील राऊत, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, ढिवरूजी मेश्राम, दिवाकर मिसार, रमेश चौधरी, संजय चेन्ने, सुनील चटगुलवार, दामदेवजी मंडलवार, घनश्याम मुरवतकर, माजिद सय्यद, नदीम नाथांनी, नितेश राठोड, रवी मेश्राम, विपुल एलटीवार, गौरव येनप्रेड्डीवार, रत्नाकर मुडले, संजय मादेश्वर, संजय पोरड्डीवार, मोहन ठाकरे, श्याम बावणे, अनिल भोयर, भीमराव मेश्राम, दिलीप कोरेवार, विजय गद्देवार, दिवाकर भोयर, अखिलेश गद्देवार, राजू निकुरे, सुरेश मेश्राम, श्रीकृष्ण भोयर, नरहरी खोब्रागडे, विश्वनाथ भोयर, ज्योतीताई मेश्राम, उर्मिला वाळके, कविता दुर्गे, नंदाताई मेश्राम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







