Home गडचिरोली विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी एकमेकांच्या सहकार्याने काम करा

विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी एकमेकांच्या सहकार्याने काम करा

102

– धानोरा पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत आमदार डॉ. देवरावजी होळी यांची अधिकाऱ्यांना सूचना

– जलजीवन मिशन अंतर्गत कामात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश

– धानोरा पंचायत समितीची वार्षिक आमसभा विविध विषयांनी गाजली

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पाहिलेल्या विकसित भारत संकल्पनेच्या पूर्तीसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी किसान भवन धानोरा येथे झालेल्या धानोरा पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेच्या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली.

यावेळी मंचावर भाजपाचे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, तहसीलदार लोखंडे, संवर्ग विकास अधिकारी टिचकुले, बाजार समितीचे सभापती शशिकांतजी साळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील पोरेटी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमसभेमध्ये विविध विषयांवर वादळी चर्चा झाली. नागरिकांनी जलजीवन मिशनच्या संदर्भात उपस्थित केलेल्या गैरप्रकारची चौकशी करण्याचे निर्देशही आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

error: Content is protected !!