Home गडचिरोली आमदार कृष्णा गजबे यांचे शेतकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत

आमदार कृष्णा गजबे यांचे शेतकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत

123

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कृषी पंपधारकांना १२ तास सुरळित विज पुरवठा सुरू करुन रब्बी पिकावरील आलेले सिंचनाचे संकट टाळण्यासाठी क्षेञाचे आमदार कृष्णा गजबे यांनी सतत पाठपुरवठा करत महाराष्ट्राचे ऊर्जामंञी, उपमुख्यमंञी तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंञी नाम. देवेन्द्रजी फडणवीस यांच्यासह विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केलेल्या विनंतीला मोठे यश प्राप्त झाले. या क्षेञासह संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील कृषीपंप धारकांना आजपासूनच १२ तास सुरळीत विजपुरवठा सुरु करवुन दिला त्यांच्या या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी देसाईगंजच्या मुख्य चौकात आगमन होताच कृष्णा गजबे यांचे जंगी स्वागत केले.

मागील फरवरी महिण्यात संपुर्ण महाराष्ट्रात विज उत्पादक कंपण्यांकडुन १५०० मेगाव्हैट विज पुरवठा कमी झाल्याने महाराष्ट्रातील संपुर्ण जिल्ह्यात विजेचा तुटवडा भासल्याने लोड शेडिंग सुरू करण्यात आली. याची झड गडचिरोली जिल्ह्यालाही सोसावी लागली १२ तासाहून ८ तास विद्युत पुरवठ्याचे धोरण विज नियामक मंडळाने अवलंबल्याने तालुक्यातील सर्वच गावातील कृषी पंपधारकांचे रब्बी पिक धोक्यात आले. शेतकऱ्यांनी निवेदने दिली असून आंदोलन व उपोषन केले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवुन आमदार कृष्णा गजबे यांनी विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. माञ समस्या सुटत नसल्याचे लक्षात येताच ऊर्जामंञ्यांशी भेट घेवुन शेतकऱ्यांचे उभे पिक मरण्याच्या मार्गावर असून जर विज पुरवठा नियमित सुरु केला नाही तर हजारो शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. कृपया आपण मार्ग काढावा, अशी कळकळीची विनंती केल्याने ऊर्जामंञी देवेन्द्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांप्रती असलेल्या आ. कृष्णा गजबे यांच्या तळमळीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातिल कृषी पंपधारक शेतकऱ्यांना सुरळित १२ तास विद्युत पुरवठा सुरु करण्याचे आदेश दिले.

तसेच विद्युत पुरवठा सुरू असताना व्यत्यय येवु नये यासाठी शंकरपूर पॉवर स्टेशनला अतिरिक्त विज पुरवठा व्हावा यासाठी सावंगी व लाखांदुर फिडरवरुन विज जोडणी चे कामास मंजुरी मिळवुन तात्काळ काम सुरू करवून घेतले. यासह १० एमव्हिकेचे अतिरिक्त फिडरही बसवून देण्याची मागणी ही पुर्ण करवून घेतली. मागणी पुर्ण झाल्याने आ. कृष्णा गजबे मुंबईवरुन देसाईगंजला येताच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आमदारांचे लाखांदुर- ब्रम्हपुरी टी पॉईंट चौकात पुष्पहार घालुन जंगी स्वागत केले.

याप्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताश्याच्या जल्लोषात मिरवणूक काढली. आपल्या शेतकरी बांधवांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे आज फळ मिळाल्याने समाधान असल्याचे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भाजपचे जेष्ट नेते किसन नागदेवे, जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ जेठानी, नरेश विठ्ठलानी, भाजप तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, किसान आघाडीचे तालुका प्रमुख केवळराम झोडे, शहर तालुका अध्यक्ष सचिन खरकाटे, गोपाल उईके, प्रिती शंभरकर, मोहन गायकवाड, शालु दंडवते, रोशनीताई पारधी, अर्चना ढोरे, शेवंता अवसरे, वसंता दोनाडकर, भारत बावनथळे, रेवता अलोने, भाजप कार्यकर्ते व शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!