Home गडचिरोली लांजेडा/इंदिरनगर येथे बैलांच्या जंगी शंकरपटाचे थाटात उद्घाटन

लांजेडा/इंदिरनगर येथे बैलांच्या जंगी शंकरपटाचे थाटात उद्घाटन

117

– श्री संताजी जगनाडे महाराज सेवा समितीच्या वतीने बैलांचा कृषी मेळावा व शंकरपट महोत्सव

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : श्री संत संताजी जगनाडे महाराज सेवा समिती, लांजेडा/इंदिरानगरच्या वतीने बैलांचा कृषी मेळावा व बैलांचा जंगी शंकरपटाचे इंदिरा नगर/लांजेडा येथील नवीन तलावाच्या बाजूला ५ मार्च ते १५ मार्च २०२४ पर्यंत आयोजित केलेले आहे. या बैलांच्या जंगी शंकरपटाचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष म्हणुन लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, उद्घाटक शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हेमंतजी जंबेवार, सहउद्घाटक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, किसनजी वाघरे, प्रभाकरजी गव्हारे, बाळुजी भांडेकर, नरेंद्रजी भांडेकर, श्री संत संताजी जगनाडे महाराज सेवा समितीचे अध्यक्ष जयदेव नैताम, रोशन भांडेकर, उपाध्यक्ष आनंदराव भांडेकर, किरण नैताम, सचिव राकेश नैताम, अंकलेश बोबाटे, सहसचिव उद्धव नैताम, जितु बडोले, कैलास भांडेकर व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!